मंगळवेढा - नगरपालिकेसाठी दाखल झालेल्या 179 अर्जापैकी नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी परस्परविरोधी हरकती घेतल्या हरकतीचा युक्तिवाद नगरपालिकेत तब्बल दोन तास चालल्याने रात्री उशिरापर्यत तहसीलदार मदन जाधव काय निकाल देणार याची उत्सुकता मंगळवेढ्यासह जिल्ह्याला लागून राहिली.