
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा : येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात गौरवण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबई व ठाणे पोलीस आयुक्त, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.