
ST bus stuck in mud due to heavy rain in Nandur.
Sakal
मंगळवेढा : संततधार पावसामुळे तालुक्यात शेती पिकाचे बरोबर रस्त्याचे देखील नुकसान झाले. रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे मंगळवेढा आगाराची मंगळवेढा नंदुर ही बस चक्क नंदुर मध्ये बस स्थानकाजवळ चिखलात अडकली, त्यामुळे आज मंगळवेढ्यातील आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या बाजारकरू, विक्रेत्यासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.