Mangalwedha Rains : सलगर परिसरात पावसाचा हाहाकार; रस्ते बंद, पिके पाण्यात अन प्रशासन सुन्न
Mangalwedha Rains : "मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील सलगर बुद्रुक व परिसरात परतीच्या पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान करून शेतकऱ्यांना संकटात टाकलं आहे.
सलगर बुद्रुक : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील सलगर बद्रुक व परिसरातील आठ ते दहा गावांमध्ये गेल्या दहा दिवसापासुन सुरु असलेल्या परतीच्या जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे.