Mangalwedha : टेंभू योजनेला क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर

पाणी चळवळ अधिक सक्षम झाली पाहिजे, राज्य व केंद्र सरकारच्या अधिकारात ज्या योजना आहे त्या पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू
Mangalwedha
Mangalwedhasakal

Mangalwedha - सांगोला आटपाडी या दुष्काळी तालुक्याची तहान भागवणाऱ्या टेंभू उपसा सिंचन योजनेला क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी उपसा सिंचन योजना असे नाव देण्याचा ठरावासह अन्य 11 ठरावास मंगळवेढा येथील 13 दुष्काळी तालुक्याच्या 31 व्या पाणी परिषदेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Mangalwedha
Mumbai : घाटकोपर इमारत दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू; रविवारी सकाळपासून सुरू होता शोध

अध्यक्षस्थानी प्रा.शिवाजीराव काळुंगे हे होते. यावेळी प्रा. डॉ. बाबुराव गुरव, प्रा. आर. एस. चोपडे, डॉ. बाबासाहेब देशमुख,प्रा. बाळासाहेब नायकवडी, भाई चंद्रकांत देशमुख,प्रा. दत्ताजीराव जाधव,अॅड. भारत पवार,दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील,सिताराम कारखान्याच्या राजलक्ष्मी गायकवाड,जकारायाचे बी.बी.जाधव,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अॅड राहूल घुले,दयानंद सोनगे,मुरलीधर दत्तु,गोपाळ भगरे,बसवराज पाटील,तानाजी काकडे,दामोदर देशमुख,दामोदर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना निमंत्रक नाईकवाडी म्हणाले की,दुष्काळी भागाला पाणी देण्याच्या अनेक घोषणा सरकारकडून होतात पण प्रत्यक्षात खर्च पडत नाही,म्हणून जनतेनी पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याची भाषा करण्यापेक्षा पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्याच्या छाताडावर नायायची तयारी ठेवावी.या पाणी परिषदेने जनतेला सरकारला जागे केल्यामुळे अनेक योजना मार्गी लागल्या तर काही योजना अजून मार्गी लागल्या नाहीत.

Mangalwedha
Pune News : सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम तत्काळ द्यावी

पाणी चळवळ अधिक सक्षम झाली पाहिजे, राज्य व केंद्र सरकारच्या अधिकारात ज्या योजना आहे त्या पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू पण घरात बसून प्रश्न केला पाणी येणार नाही त्यासाठी चळवळीत उतरावे लागेल. प्रा. बाबुराव गुरव म्हणाले की, राज्यातील सत्ताधाय्रांनी आपापसातील भांडणे व आरोपप्रत्यारोप थांबवून,रखडलेल्या पाणीप्रश्नाला निधी द्या,पाण्यासाठी वंचित असलेल्या शेतकऱ्यानी कर्नाटकात जाण्याच्या इशारा देण्याऐवजी सरकारला वाकवण्याची तयारी ठेवावी.

मुंबईत 55 व्या मजल्यावर पोहण्यासाठी पाणी चढते,शेतीला देताना मात्र भाग चढावर आहे असे सांगून टाळले जाते.मंगळवेढा,बार्शी,लातूर,उस्मानाबाद यांचाही कृष्णा खोऱ्यातील पाण्यावर हक्क आहे.महाराष्ट्राने पाणी अडविले नसल्याने कर्नाटक सरकारला त्याच्या धरणाची उंची वाढवावी लागली,म्हैसाळच्या 6 व्या टप्प्यातील कामासाठी दोन हजार कोटीच्या कामाचे टेंडर काढले,वर्क आर्डर झाली पण कामास सुरूवात नाही.

Mangalwedha
Mumbai Crime : इराणी चोर जंगलात धावला, चिखलात झोपला शेवटी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने त्याला हेरले आणि हाती बेड्या ठोकल्या

अॅड बाबासाहेब देशमुख म्हणाले स्वातंत्र्यानंतर या देशातील शेतकऱ्यालाच पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागतात.सांगोल्याच्या पाण्यासाठी स्व आबासाहेबाचे योगदान विरोधी पक्षाला देखील मान्य आहे इथल्या पाण्याचे श्रेय इतराना घेण्याचा नाही.अध्यक्षपदावरून बोलताना शिवाजीराव काळुंगे म्हणाले की,सरकार कोणाचेही असो पाणी प्रश्न मार्गी लागला नाही.म्हणून या परिषदेत मांडलेले ठराव आपणास शासनदरबारी नेऊन पाठपुरावा करावा लागेल.

Mangalwedha
Pune Crime : वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या तक्रारदारांमध्ये हाणामारी

टेल एंडच्या मंगळवेढा तालुक्यावर मोठा अन्याय सुरू आहे. म्हैसाळचे पाणी लगेच बंद केल्याने फक्त जनावराची तहान भागली पण शेतीच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतून 45 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

स्व भारत भालके यांनी पाठपुरावा केलेल्या त्या योजनेसाठी पुर्ण ताकदीने परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे प्रयत्न करणे गरजेचे आहे.सिताराम कारखान्याच्या राजलक्ष्मी गायकवाड म्हणाल्या की,स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाच्या बरोबरीने आजही पाण्यासाठी संघर्ष करावा,हे दुर्दैव,आहे,

Mangalwedha
Mumbai : घाटकोपर इमारत दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू; रविवारी सकाळपासून सुरू होता शोध

पाण्याच्या चळवळीत स्व.नागनाथ नाईकवाडी,स्व गणपतराव देशमुख यांच्या सोबतीला शिवाजीराव काळुंगे यांचे योगदान कौतुकास्पद ठरले.यावेळी अॅड भारत पवार,दामोदर देशमुख,बी.बी.जाधव,भाई चंद्रकांत देशमुख यांची भाषणे झाली.सुत्रसंचालन इंद्रजीत घुले यांनी तर आभार अॅड राहूल घुले यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com