मंगळवेढा - शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनामध्ये तालुक्यातील 198 शाळांमधील 924 शिक्षक सहभागी झाले. आंदोलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एक दिवशीय खेळखंडोबा झाला..तालुक्यामध्ये अगोदरच प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत ती रिक्त भरण्याकडे शिक्षण खाते सोयीस्करित्या दुर्लक्ष करीत असतानाच शिक्षकांनी टीईटी अनिवार्यतेबाबत केंद्र शासनाने कायद्यात दुरुस्ती करुन शिक्षकांच्या सेवेला संरक्षण मिळावे.१५ मार्च २०२४ च्या नवीन संच मान्यता निकषांमुळे अनेक शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाल्याने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली. दि. १ सप्टेंबरच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अनेकविध पद्धतीने संघटनांकडून शासनाला साकडे घालण्यात आले..देशातील काही राज्य सरकारांनी याबाबतीत पुनर्विचार याचिका दाखल केल्या तर काही राज्यांनी केंद्र शासनाकडे शिक्षकांच्या संरक्षणार्थ अनुकूल प्रस्ताव सादर केले. मात्र महाराष्ट्र शासनाने याबाबतीत दुर्लक्ष केले.केंद्र शासनाने आर.टी.ई. कलम 23 मध्ये तसेच एन.सी.टी.ई.अधिसूचनेत दुरुस्ती करावी यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हे शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले. तालुक्यामध्ये प्राथमिक 183 नगरपालिकेच्या 8 तर खाजगी 72 शाळा असून त्यामधील 65 शाळांनी आजच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला नाही..याशिवाय जिल्हा परिषदेचे 507 नगरपालिकेचे 32 आणि खाजगी 385 असे 924 शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी झाले तर 412 शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग घेतला नव्हता आजच्या आंदोलनातून टीईटी अनिवार्यतेमुळे थांबलेली पदोन्नती प्रक्रिया सुरु करावी..मूळची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, मुख्यालयी वास्तव्याची अट शिथिल करावी, सर्व विषय शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ द्यावा, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करावी, अशैक्षणिक कामे व अनाठायी उपक्रम बंद करावीत, न.पा. /मनपा शिक्षकांच्या वेतनासाठी स्वतंत्र वेतनपथक गठीत करण्यात यावे.वस्ती शाळा शिक्षकांची सेवा त्यांच्या मूळ नियुक्ती दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी, आश्रमशाळेतील कंत्राटी शिक्षक भरती रद्द करावी अशा विविध मागण्या समोर मांडण्यात आल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.