

Mangalwedha Solapur Highway Accident
sakal
बेगमपूर, : मंगळवेढ्याहून सोलापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर अन्य दोघे युवक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. १३) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बेगमपूर-इंचगावदरम्यान यमुना मंगल कार्यालयाजवळ घडली.