

School students protest for Maratha reservation in Mangalwedha
Sakal
मंगळवेढा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी गेल्या अकरा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने यावर अद्याप तोडगा काढला नसल्यामुळे मराठा आरक्षण मिळू दे आमचे भविष्य फुलू दे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, माझं भविष्य घडवायचं आहे मराठा आरक्षण मिळवायचं असे फलक हातात घेऊन शहरातील मराठा समाजातील शाळकरी विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात दोन तास ठिय्या मांडला. यावेळी देण्यात आलेल्या घोषणेमुळे तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला शेवटी प्रभारी तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.