

Son Tried to Mislead Police with Wild Animal Attack Story
esakal
मंगळवेढा : घरगुती कारणाचा राग मनात धरून जन्मजात या मुलाने वडिलांचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना तालुक्यातील डोणज येथे घडली. मात्र या प्रकरणात मुलाने वडिलांचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव केला मात्र पोलिसांनी काही क्षणात या घटनेचा तपास लावत मुलास ताब्यात घेतले. या प्रकरणातील सविस्तर हकीकत अशी की महादेव कुसाप्पा पुजारी वय 70 हे जमिनीची वाटणी करू देत नाहीत. व जनावरे शेतातील पिकात गेल्यावर गेल्याच्या कारणाने भांडण करतात व घरात पुरेशी पाणी भरू देत नाहीत.