Mangalwedha ST Depot Tops Solapur District in Revenue

Mangalwedha ST Depot Tops Solapur District in Revenue

sakal

Mangalwedha ST Depot : मंगळवेढा एसटी आगाराची जिल्ह्यात 'पहिली' झेप; १० लाखांच्या उत्पन्नासह सोलापूर जिल्ह्यात अव्वल!

Solapur ST Mahamandal: मंगळवेढा आगाराने डिसेंबर महिन्यात १० लाख १० हजारांचे उत्पन्न मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय सहली, धार्मिक स्थळांसाठीच्या विशेष फेऱ्या आणि नवीन बसेसमुळे आगाराने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Published on

मंगळवेढा : मंगळवेढा आगाराने डिसेंबर महिन्यात विविध मार्गावर केलेल्या फेऱ्यांमधून 10 लाख 10 हजाराचे उत्पन्न मिळवून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.सध्या आगाराकडे 61 बसेस कार्यरत असून या बसेसच्या माध्यमातून विविध मार्गावर 384 फेऱ्या केल्या जातात. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी आगाराकडे 136 चालक असून 97 वाहक आहेत तब्बल 25 वाहकांची संख्या कमी असताना देखील मंगळवेढा आगाराने जिल्ह्यात उत्पन्नात आघाडी घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com