"Mangalwedha youth trek 47 KM from Panhala to Pawankhind, reviving the valorous tale of Chhatrapati Shivaji Maharaj."Sakal
सोलापूर
Gadkot Campaign: पन्हाळा ते पावनखिंड ४७ किलोमीटर गडकोट मोहीम; मंगळवेढ्यातील तरुणांचा सहभाग; जाणून घेतला शिवरायांचा इतिहास
Panhala to Pawankhind Fort March: दुर्गभ्रमंतीकार शिवरत्न शेटे यांच्या पुढाकारातून हिंदवी परिवाराकडून दरवर्षी असे कार्यक्रम होतात. छत्रपती शिवरायांनी पन्हाळगडातून विशाळगडाकडे घौडदौड करताना पावसाळ्याचे दिवस होते. म्हणून हिंदवी परिवाराने याच दिवसात ही गडकोट मोहीम राबवली.
मंगळवेढा : सोलापूरच्या हिंदवी परिवाराने आयोजित केलेल्या गडकोट मोहिमेतील पन्हाळा ते पावनखिंड या पायी दौडीमध्ये मंगळवेढ्यातील आठ तरुणांनी सहभाग घेत छत्रपती शिवरायांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा जाणून घेतल्या.

