Mangalwedha All-Party Front Strategizes to Stop BJP from Power
Sakal
Solapur Politics : मंगळवेढ्यात सत्ताधारी पक्षाचा नगराध्यक्ष कोण; उत्सुकता शिगेला!
मंगळवेढा : स्थानिक आमदार व जिल्हाध्यक्ष भाजपचा असल्यामुळे नगरपालिकेवर भाजपावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाने ताकद लावली.अशा परिस्थितीत त्यामधील काही कार्यकर्त्यांनी आघाडी करून निवडणूक लढवण्याबद्दलचा सूर व्यक्त केला मात्र भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला कमळ चालते मग नगरपालिकेला का नको ही भूमिका ठेवून नगरपालिका कमळ चिन्हावर लढण्याबद्दल आग्रही भूमिका मांडली त्यानुसार भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रा. तेजस्विनी कदम व प्रा.सुप्रिया जगताप व राधा सुरवसे या तिघीनी मुलाखती दिल्या याशिवाय अन्य नावावर देखील चर्चा झाली मात्र सध्या शहरांमध्ये प्रा.तेजस्विनी कदम की प्रा. सुप्रिया जगताप यापैकी कुणाला उमेदवारी भारतीय जनता पार्टी कडून मिळणार याची चर्चा सुरू आहे.

