

Intense Scrutiny of Nominations Sparks Heated Political Atmosphere
Sakal
मंगळवेढा : नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्जाच्या छाननी दरम्यान परस्परविरोधी घेतलेल्या हरकतीमुळे व सुनावणीस लागलेला पाच तास वेळ पाहता निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की,मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारातील राष्ट्रवादी (श.प) शुभांगी कौडूभैरी व अपक्ष प्रा. तेजस्विनी कदम यांचे आव्हान आहे या दोघांच्या भूमिकेवर प्रा. सुजाता जगताप व सुनंदा आवताडे यांच्यात विजयाचे गणित अवलंबून आहे. अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवट दिवस असून आज प्रभाग एक मधील बाळासाहेब साळुंखे व प्रभाग पाच मधील निलेश सूर्यवंशी हे दोन आज मागे घेण्यात आले.