
- राजकुमार घाडगे
पंढरपूर : पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील तापमान मार्च महिन्याच्या अखेरीस ३८ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान गेले आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रखर सूर्यकिरणांपासून आंबा फळांचे नुकसान होऊ नये याकरिता आंबा बागायतदार आंबा फळांना कागदी पिशवीचे आवरण घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.