

- हुकूम मुलाणी
मंगळवेढा : येथील आगारामध्ये खराब आणि जुन्या बसेसमुळे एसटीची सुविधा प्रवाशाच्या दृष्टीने असून अडचण नसून खोळंबा अशी होत आहे. प्रवाशांना चांगली सोय देण्यासाठी नवीन बस देण्याबाबत महामंडळाच्या वरिष्ठाकडून आगाराला सवतीची वागणूक दिल्याची प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून होत आहे.