
Dr. Shirish Valsangkar Suicide Case Upadate: डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मुलगा डॉ. आश्विन यांनी दिलेल्या फिर्यादीत मनीषा माने यांच्या ई- मेलबद्दल अर्धवट माहिती दिली आहे. वास्तवात त्या मेलमध्ये मनीषा यांनी वळसंगकर कुटुंबातील गृहकलहावर बोट ठेवल्याची बाब पुढे येत आहे. अटकेत असलेल्या मनीषा माने- मुसळे यांनी केवळ एक दिवसाच्या पगारीच्या विषयावर तब्बल तीन पानांचा मेल मृत डॉक्टरांसह मुलगा आणि सुनेलाही पाठवला. त्यात प्रामुख्याने गृहकलहावर लिहिले आहे.