

manohar bhosle
esakal
कुर्डुवाडी: आर्थिक अडचणीतील व्यावसायिकाला व्यवसायात प्रगती होण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगून दोन लाखांची मागणी करून ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, सध्या रा. मांजरी, पुणे) व त्याचा साथीदार विशाल वाघमारे (रा. मांजरी, पुणे) या दोघांना कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली आहे. उद्या (शनिवारी) दोघांनाही न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.