

sakal
पांडे : मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे याचा फायदा गरजूंना होत असून, ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. यानंतर सातारा संस्थान गॅझेट व कोल्हापूर संस्थांच्या गॅजेटचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर याचा फायदा राज्यातील वंचित समाज बांधवांना होणार आहे. सात तारखेपर्यंत या संदर्भात सकारात्मक निर्णय अपेक्षित असून तो न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.