

Maratha Quota Protest Manoj Jarange Patil Refuses To Step Back Until 58 Lakh Kunbi Records Receive Official Certificates
sakal
सरकोली : मराठा समाजाला ५८ लाख कुणबी नोंदींचे दाखले मिळेपर्यंत तसेच सर्व शासन निर्णयांची अंमलबजावणी होईपर्यंत आरक्षणाच्या आंदोलनातून माघार घेणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी सरकोली (ता. पंढरपूर) येथे केला. मराठा समाजाने राजकीय पक्ष बाजूला ठेवून आरक्षणाच्या प्रश्नासाठी एकजूट होण्याचे आवाहनही त्यांनी केले.