
पांगरी : मुंबई येथे २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे- पाटील यांनी अचानक कारी (ता. बार्शी) येथे भेट देत चावडी बैठकीतून जनतेशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी मराठा समाजबांधवांना आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आणि समाजात प्रबोधन करण्याचे आवाहन केले.