बाजार समितीच्या गेटवर निघाले 33 शेतकरी कोरोना पॉझिटिव्ह !

बाजार समितीच्या गेटवर कोरोना टेस्टमध्ये निघाले अनेक शेतकरी पॉझिटिव्ह
Corona Test
Corona TestEsakal
Updated on
Summary

बाजार समितीच्या गेटवरच शेतकऱ्यांची कोरोना चाचणी सुरू आहे. कडक लॉकडाउन काळात आतापर्यंत 31 शेतकरी पॉझिटिव्ह आले आहेत.

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona) वाढणार नाही याची खबरदारी घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवरच शेतकऱ्यांना कोरोना चाचणीचे (Covid-19 test) बंधन घालण्यात आले आहे. 23 एप्रिल ते 21 मे या काळात सोलापूर बाजार समितीत आलेल्या तीन हजार 245 शेतकऱ्यांची कोरोना चाचणी झाली. त्यात 31 शेतकरी कोरोनाबाधित आढळले. काही शेतकऱ्यांवर रुग्णालयात तर काहींवर कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care center) उपचार सुरू आहेत. (Many farmers became corona positive in the test at the Solapur market committee)

Corona Test
का होतो "म्युकरमायकोसिस'? जिल्ह्यात 157 पैकी सात रुग्णांचा मृत्यू

सोलापूर बाजार समितीत उस्मानाबाद, लातूर, नाशिक, कर्नाटकसह सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांतून शेतमाल विक्रीसाठी आणला जातो. कडक संचारबंदीत शेतकऱ्याच्या शेतमालाला अपेक्षित दर मिळाला नाही. कांद्याचा दर आता शंभर रुपये क्‍विंटल इतका झाला असून इतर भाज्यांचेही दर घसरले आहेत. आता ग्रामीण भागात 1 जूनपर्यंत कडक लॉकडाउन केल्याने पुन्हा शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. ग्रामीण भागातील लॉकडाउनमुळे जिल्ह्यातून येणारी भाजीपाल्याची आवक खूपच कमी झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव अंबादास बिराजदार यांनी दिली. दरम्यान, पोलिसांची दंडेलशाही, बाजार समितीच्या गेटवरच कोरोना चाचणी, ग्रामीण भागात कडक लॉकडाउन या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक घटल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाच्या निर्देशानुसार लॉकडाउन संपेपर्यंत बाजार समितीच्या गेटवर सर्व शेतकऱ्यांची कोरोना चाचणी होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Corona Test
पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू! नंदूर येथील घटना

बाजार समितीच्या गेटवरच शेतकऱ्यांची कोरोना चाचणी सुरू आहे. कडक लॉकडाउन काळात आतापर्यंत 31 शेतकरी पॉझिटिव्ह आले आहेत. परंतु, व्यापारी, शेतकऱ्यांना पोलिसांकडून दमदाटी केली जात असल्याने आवक घटली असून भुसार व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बेमूदत बंदचा इशारा दिला आहे. पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षा असून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यावी एवढीच अपेक्षा आहे.

- अंबादास बिराजदार, प्रभारी सचिव, बाजार समिती, सोलापूर

भुसार दुकाने बंदचा आज अंतिम निर्णय

पोलिसांनी भुसार व्यापाऱ्याला दमदाटी करून मारहाण केल्याचा निषेध व्यक्‍त करीत भुसार व्यापारी संघाने सोमवारपासून सर्व दुकाने बंद केली जातील, असे पत्र बाजार समितीला दिले आहे. परंतु, भुसार हे अत्यावश्‍यक सेवेत येत असल्याने तुम्हाला ते बंद ठेवता येणार नाहीत, असे उलट पत्र बाजार समितीने त्यांना दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी भुसार व्यापारी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे सोमवारपासून भुसार दुकाने बंद राहणार की सुरू राहतील, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com