esakal | का होतो "म्युकरमायकोसिस'? जिल्ह्यात 157 पैकी सात रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

सद्य:स्थितीत शहरात 98 तर ग्रामीणमध्ये 59 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले असून त्यातील 27 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 14 दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

का होतो "म्युकरमायकोसिस'? जिल्ह्यात 157 पैकी सात रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाचा (Covid-19) सामना करत असतानाच आता "म्युकरमायकोसिस' (Mucormycosis) या आजाराचा प्रादुर्भाव शहर- जिल्ह्यात वाढू लागला आहे. सद्य:स्थितीत शहरात 98 तर ग्रामीणमध्ये 59 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले असून त्यातील 27 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 14 दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. 8 मे रोजी शहरात पहिला रुग्ण या आजाराचा आढळला. उर्वरित रुग्णांवर शहरातील 17 रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. (Patients with Mucormycosis infarction are undergoing treatment at Solapur hospitals)

हेही वाचा: जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट ! सध्या 16 हजार 855 रुग्णांवर उपचार

कोरोना काळात रुग्णांसाठी वापरले जाणारे स्टेरॉईड व अँटिबायोटिकमुळे (Steroids and antibiotics) रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power) कमी झालेली असते. आशा वेळी त्या ठिकाणी स्वच्छता न ठेवल्यास नाक व तोंडाद्वारे बुरशीचा संसर्ग (Fungal infections) होतो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने व रक्तातील साखर वाढली की बुरशीच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण होते. त्यानंतर हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो.

कोरोना होऊ न देणे हाच या आजारावर ठोस उपाय आहे. व्यक्‍तीची रोगप्रतिकारकशक्‍ती कमी झाली आणि शरीरातील साखर वाढल्यानंतर नाकातील हाडपासून या आजाराची सुरवात होते. हा आजार संसर्गजन्य नसून एकमेकांपासून इतरांना तो होत नाही. कोरोना काळात अनेक रुग्णांवर जास्त दिवस उपचार सुरू आहेत. या काळात त्यांना विविध प्रकारची औषधे दिली जात असून अनेक रुग्ण ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरवर ठेवले जात आहेत. त्यामुळेही या आजाराला निमंत्रण मिळत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना केल्या जात आहेत.

हेही वाचा: "लष्कर' परिसर रविवारनंतर घेणार मोकळा श्वास ! 19 बाधित

या आजाराच्या रुग्णांना तीन प्रकारचे इंजेक्‍शन्स दिली जात आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी राज्य सरकारकडून इंजेक्‍शन उपलब्ध झाले असून त्याचे वाटप संबंधित रुग्णालयांना करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. ऑक्‍सिजन पाइप व ऑक्‍सिजन मास्क, ऑक्‍सिजन थेरेपीत वापरले जाणारे पाणी, वैद्यकीय उपचारासाठी वापरले जाणारे साहित्य, जेवण व पिण्याचे पाणी यातून हा रोग वाढतो, असे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदवले आहे.

शहरात म्युकरमायकोसिस या आजाराचे सध्या 98 रुग्ण आहेत. आतापर्यंत सात रुग्णांचा मृत्यू या आजाराने झाला असून, या आजाराला रोखण्यासाठी महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस उपाययोजना केल्या जात आहेत.

- धनराज पांडे, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका

"म्युकरमायकोसिस'ची सद्य:स्थिती

  • एकूण रुग्ण : 157

  • आतापर्यंतचे मृत्यू : 7

  • बरे झालेले रुग्ण : 27

  • उपचारासाठी रुग्णालये : 17

उपचार करणाऱ्या रुग्णालयांना इंजेक्‍शन्स

अश्‍विनी सहकारी रुग्णालय, बलदवा हॉस्पिटल, सोलापूर ईएनटी हॉस्पिटल, सीएनएस, स्पर्श, 32 सोल्यूशन हॉस्पिटल, केळकर नर्सिंग होम ऍण्ड ऍडव्हान्स ईएनटी केअर सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल, निर्मल अनोरेकटल हॉस्पिटल, गंगामाई, युनिक, चिडगुपकर, यशोधरा, प्रधान आय हॉस्पिटल, रवींद्र व्हनकडे क्‍लिनिक, जयराम आय हॉस्पिटल व सुयोग हॉस्पिटल या ठिकाणी म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारची 197 इंजेक्‍शन्स उपलब्ध करून दिली आहेत.

loading image
go to top