

Solapur Court Sees 30 Suspects In Maratha Kranti Morcha Case Including Four MLAs And Former Minister And MP
Sakal
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ४ जुलै २०२१ रोजी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाप्रकरणी दाखल गुन्ह्यात चार आमदारांसह ३० संशयित शनिवारी (ता. २९) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. शिंदे यांच्या न्यायालयात हजर झाले. या प्रकरणात एकूण ४८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यापैकी ३० संशयितांनी न्यायालयात हजेरी लावली.