

मुंबई : महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. पण मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर सुरुवातीला शरद पवार यांनी या बंदमधून माघात घेत असल्याचं जाहीर केलं होतं. पण मविआतल्या काँग्रेस अन् शिवसेनेनं आपली भूमिका मांडली नव्हती. पण आता शिवसेनेनं देखील हा बंद मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन बंदबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.