Kunbi Record : भोसे येथे आढळले कुणबी जातीचे पुरावे

शाळेतील दप्तर : एकूण १४ लोकांच्या नावापुढे आढळला उल्लेख
maratha reservation bhose found 14 kunbi record manoj jarange patil solapur
maratha reservation bhose found 14 kunbi record manoj jarange patil solapurSakal

भोसे (क) : संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले असून त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटल्यानंतर शासन खडबडून जागे झाले आहे. दुसरीकडे गावागावांमधील अभ्यासकांनी जुन्या दप्तरांची पडताळणी सुरू केली असून या पडताळणीमध्ये भोसे (ता. पंढरपूर) येथे कुणबी जातीचे पुरावे आढळून आले आहेत.

मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बळ मिळावे यासाठी गावोगावी शांततेच्या मार्गाने उपोषणे सुरू आहेत. तसेच कुणबी जातीच्या प्रमाणपत्रांचा अभ्यासही सुरू आहे. भोसे (ता. पंढरपूर) येथील इतिहास संशोधक प्रा. महादेव तळेकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (पूर्वीचे लोकल बोर्ड) दप्तर तपासले असता त्यांना १४ लोकांच्या नावापुढे मराठी भाषेत कुणबी जातीची नोंद असल्याचे आढळून आले.

यावेळी त्यांनी १८८१ ते १९६५ पर्यंतचे दप्तर पहिले असता त्यांना साधारण १९०० ते १९१९ पर्यंतच्या दस्तऐवजामध्ये मराठी भाषेत कुणबी जातीची नोंद असल्याचे आढळून आले. त्यापूर्वीच्या नोंदी या मोडी लिपीतील असल्याचे दिसून आले. या मोडी लिपीतील काही नोंदी तत्सम असल्याचे दिसून येत आहे. परंतु त्याची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर अधिकृत आकडा समजून येईल असे प्रा. तळेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांचे सोबत अजय जाधव, विकास गावंधरे, बापूराव तळेकर पांडुरंग सुरवसे आदि उपस्थित होते.

१९०० च्या दरम्यानचे दाखले, नोंदी, दस्त तपासावेत

संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळवेत ही मनोज जरांगे-पाटील यांनी केलेली मागणी रास्त असून त्या मागणीला आता अधिक बळ मिळाले आहे. यासाठी मराठा समाजातील नागरिकांनी शाळेतील दाखले १९०० च्या दरम्यानचे दाखले, त्याच दरम्यानचे खरेदी विक्री दस्त, जन्ममृत्यूची नोंद, स्कीमचे उतारे आदी कागदपत्रांची पडताळणी करावी. यामध्ये निश्चितपणे कुणबी जातीचा उल्लेख असलेल्या नोंदी सापडतील, असे सांगून या सारखे पुरावे आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील जुन्या शाळेमधील दप्तरांची पाहणी करून गोळा करण्यास सुरवात केली असल्याचे श्री. तळेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com