Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी गाव बंदच्या हाकेला ग्रामपंचायतीची साथ

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलने चालू आहेत.या आंदोलनात आता सलगर बुद्रुक या गावाने देखील उडी घेतली
Maratha Reservation
Maratha Reservationsakal
Updated on

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलने चालू आहेत.या आंदोलनात आता सलगर बुद्रुक या गावाने देखील उडी घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सलगर बुद्रुक गावातील इतर समाजातील घटकांनीही पाठींबा द्यावा व एक दिवस गाव बंद करावे अश्या आशयाचे निवेदन मराठा समाजाने गावचे प्रथम नागरिक सरपंच श्रीकांत धायगोंडे यांच्याकडे दिले.

यासाठी ता.16 सप्टेंबर वार शनिवार रोजी गावबंद आंदोलन करावे अशी विनंती त्या निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सरपंच धायगोंडे यांनी ग्रामपंचायती मार्फत गावातील सर्व समाज घटकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे व मराठा बांधवांच्या लढ्याला साथ द्यावी असे पत्रक काढले आहे. सरपंचाच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान आरक्षण प्रश्नी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सलगर बुद्रुक गावातील मराठा समाजातील युवकांनी ग्रामपंचायती मध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत गाव बंदची हाक देण्यात आली. या बैठकीत गावातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maratha Reservation
Maratha Reservation : असे हाेते अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे यांचे आंदोलन

दरम्यान या आंदोलनात दूध डेअरी,दवाखाने,मेडिकल व इतर अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवणाऱ्या घटका व्यतिरिक्त इतर सर्व व्यापारी वर्गांना सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत आवाहन करण्यात आले आहे.सलगर ग्रामपंचायतीच्या या भूमिकेचे सर्व मराठी समाजाने कौतुक केले आहे.

दरम्यान अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले जरांगे पाटलांचे आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांच्या अश्वासनांतर थांबले असले तरी,कायदेशीर आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार सलगर बुद्रुक मधील मराठा बांधवांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com