मंगळवेढा - मराठा आरक्षण आंदोलन चे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्य सरकारच्या विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी राज्यभरातील सकल मराठा बांधवांना केलेल्या आवाहनाला साद देत आंदोलनासाठी मंगळवेढ्यातील तिघांनी थेट सायकलवर जाऊन आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी मार्गस्थ झाले.