
-प्रमोद बोडके
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चार आठवड्यात सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ५ मार्च रोजी दिले आहेत. या आदेशानुसार कार्यवाही करण्यासाठी २ एप्रिलची मुदत आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चला संपत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान टाळण्यासाठी मार्च ‘एण्ड’पासून सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक ‘स्टार्ट’ केली जाऊ शकते.