esakal | म्हणून सोलापुरातली बाजार समिती सुरू; अन्‌ मंगळवार बाजारात तर भयानच स्थिती... (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Market Committee started in Solapur

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या निर्णयानुसार कामकाज सुरू आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हाताला सॅनिटाझर लावूनच प्रवेश दिला जात आहे. व्यापाऱ्यांनाही योग्य त्या सूचना दिल्या आहेत. जागृतीसाठी पत्रकेही लावण्यात आली आहेत. 
- उमेश दळवी, प्र. सचिव, 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

म्हणून सोलापुरातली बाजार समिती सुरू; अन्‌ मंगळवार बाजारात तर भयानच स्थिती... (Video)

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर "कोरोना'चा अद्याप काहीही परिणाम जाणवत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कायम असून "कोरोना'च्या प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून कर्मचारी आणि व्यापारी दक्षता घेत आहेत. मात्र, मंगळवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारावर अत्यल्प परिणाम होता. हा बाजार बंदच ठेवायचा होता. मात्र, अचानक शेतकऱ्यांना माहिती देणे शक्‍य नव्हते म्हणून बाजार सुरू ठेवल्याचे येथील कर्मचाऱ्याने सांगितले. तर शहरातला सर्वात मोठा समजला जाणाऱ्या आठवडा बाजारात नेहमीपेक्षा गर्दी कमी होती. या बाजारात 500 रुपयांची गावरान कोंबडी 200 रुपयांना दिली जात होती. 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह नगर, लातूर, उस्मानाबाद येथून व शेजारी आंध्र प्रदेश व कर्नाटकमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल घेऊन येतात. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून आठवडा बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मात्र, सोलापूर बाजार समितीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मंगळवारी येथे जनावरांचा बाजारही भरतो. त्यात बकरे मोठ्याप्रमाणात विक्रीसाठी येतात. त्यानुसार मंगळवारी बाजार समितीच्या समोरील जागेत मोठ्याप्रमाणात बकरी विक्रीसाठी आली होती. तेथील एका कर्मचाऱ्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले की, या बाजारात ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात शेतकरी बकरी विक्रीसाठी येतात. अचानक बाजार बंद केला असता तर त्यांची अडचण झाली असती. त्यामुळे बाजार बंद केला नाही. मात्र, पुढच्या मंगळवारचा बाजार भरेल की, नाही हे सांगता येणार नाही. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर आम्ही काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
बाजार समितीमध्ये प्रवेशद्वारात असलेले सुरक्षा रक्षकही मंगळवारी सकाळपासून तोंडाला रुमाल बांधून उभा असल्याचे चित्र होते. व्यापारीही काळजी घेताना दिसत होते. बाजार समितीच्या मुख्य इमारतीत प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हाताला सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात होता. व्यापाऱ्यांनाही दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी जागृती करण्याचे फलक लावण्यात आले आहेत. 


"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या निर्णयानुसार कामकाज सुरू आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हाताला सॅनिटाझर लावूनच प्रवेश दिला जात आहे. व्यापाऱ्यांनाही योग्य त्या सूचना दिल्या आहेत. जागृतीसाठी पत्रकेही लावण्यात आली आहेत. 
- उमेश दळवी, प्र. सचिव, 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती