
सोलापूर : पतीने घरी असताना तीनवेळा तलाक तलाक तलाक असे म्हणून घटस्फोट दिल्याचे सांगून घरातून हाकलून दिल्याची फिर्याद तनजिला अहमदअली पठाण (रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. त्यावरुन विवाहितेच्या पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.