Wife Harassed by In-laws Over Character: भूषण याने दारूच्या नशेत त्यावरून व तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास दिला. माहेरहून १० लाख रुपये आण म्हणून तिच्यामागे तगादा लावला. तिने पैसे न आणल्याने त्याने दमदाटी केली. तिला व्हाट्स ॲपवर संदेश पाठवून तिच्या चारित्र्याबाबत संशय व्यक्त केला.
सोलापूर: चारित्र्याच्या संशयासह माहेरहून १० लाख रुपये आण म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चारजणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.