धक्कादायक! ‘नवऱ्याला दारू दिली तर मी फाशी घेईन’; विवाहितेचा हातभट्टी विक्रेत्याला इशारा; संसार सांभाळताना होतेय ओढाताण

Married Woman’s Plea to Bootlegger: गावागावात खुलेआम विक्री होणाऱ्या हातभट्टी दारूने शेकडो तरुणांचे सुखाचे संसार मोडले आहेत तर अनेक नवविवाहितांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. बहुसंख्य गुन्ह्यात कौटुंबिक वादाचे कारण देखील हातभट्टीची दारूच आहे.
A desperate woman confronts a local bootlegger, warning him against selling alcohol to her husband, citing the family's emotional and financial breakdown.
A desperate woman confronts a local bootlegger, warning him against selling alcohol to her husband, citing the family's emotional and financial breakdown.Sakal
Updated on

सोलापूर : पतीचा दूध संकलनाचा व्यवसाय, कधी शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या तरुणाचा संसार सुखाचा सुरू होता. पण, तरुणाला गावात खुलेआम विक्री होणाऱ्या हातभट्टीच्या दारुचे व्यसन लागले आणि संसारात विघ्न आले. आता मोठी मुलगी दहावीला, छोटी मुलगी आठवीत आणि मुलगा पाचवीच्या वर्गात असताना देखील तो तरुण मद्यधुंद असतो. यामुळे वैतागलेली विवाहिता हातभट्टी विक्रेत्याकडे थेट गेली आणि ‘तुम्ही यापुढे माझ्या नवऱ्याला दारू दिली तर मी इथेच फाशी घेऊन आत्महत्या करीन’ असा इशारा दिला. ही व्यथा आहे उपळाई ठोंगे (ता. बार्शी) या गावातील विवाहितेची.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com