मंगळवेढा - कात्राळ येथील शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्या मृतदेहावर आज जन्मगावी शासकीय इतमामात त्याच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाने कात्राळ परिसरात शोककळा पसरले..त्याच्या पक्षात आई-वडील पत्नी भाऊ-बहीण असा परिवार आहे. मंगळवेढा कर्नाटक सीमेलगत असलेल्या कात्राळ या गावातून तो सैन्य दलात भरती झाला होता. येत्या 28 नोव्हेंबर रोजी त्याच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस होता त्या वाढदिवसाला येण्यासाठी त्यांनी 25 नोव्हेंबरला विमानाचे तिकीट बुक केले..परंतु तिसरा वाढदिवस करण्यापूर्वीच त्याचा आसाम मधील मिलिटरी कॅम्पस मध्ये झालेल्या अपघातात त्याचा अपघाती मृत्यू झाला त्याचे पार्थीव शरीर विमानाने पुणे येथे आणण्यात आले व पुण्यातून शासकीय रुग्णवाहिकेतून आज सकाळी 7 वा. मंगळवेढा येथे आणण्यात आले.शहरातील दामाजी चौकात माजी सैनिक संघटना व न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी त्याला रस्त्याच्या दुतर्फा हजेरी लावून पुष्पवृष्टी केली. यावेळी अजित जगताप,सुनंदा अवताडे, यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..त्यानंतर मरवडेत हनुमान विद्यामंदिर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी केली त्यानंतर कात्राळ गावाच्या वेशीपासून ते घरापर्यंत स्व. भारत भालके पोलीस प्रशिक्षण केंद्र व कात्राळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बालाजी नगर येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून त्याच्या मृतदेहावर पुष्पवृष्टीसह करत बाळासो पांढरे अमर रहे अशा घोषणा दिल्या..त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेहाचे खा.प्रणिती शिंदे, आ. समाधान आवताडे, पोलीस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, तहसीलदार मदन जाधव, प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रदीप खांडेकर, माऊली हळणवार, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात, सोलापूर जिल्हा शिक्षक समितीचे सुरेश पवार, कवळीचे राज्य सचिव अॅड. रवीकिरण कोळेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, कात्रजचे सरपंच विजय माने यांनी यावेळी मृतदेहाचे दर्शन घेत त्याला अभिवादन केले..पांढरेचा अपघातापूर्वी त्यांनी ग्रामसेवकाला फोन करून सध्या शासकीय नियमाने आकारणीत 50% सवलत देण्याच्या शासन निर्णय बद्दल बोलत असताना मी आल्यानंतर आमच्याकडे असलेली बाकी भरून सहकार्य करतो असे बोलणे झाले होते. देशावर आणि गावावर लक्ष असणारा बाळासाहेब पांढरे यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून त्याचे कार्य गावकऱ्यांसाठी नेहमी प्रेरणादायी ठरेल. शासनाने त्याच्या वारसाला नोकरी देऊन आधार द्यावा.- विजय माने, सरपंच, कात्राळ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.