

Holiday Rush Brings Huge Devotee Influx to Lord Vitthal’s Temple
Sakal
पंढरपूर: भारतीय प्रजासत्ताक दिनासह सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली आहे. रविवारी (ता. २५) संत नामदेव पायरी येथे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. गर्दी वाढल्याने विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोड वरील पत्राशेड पर्यंत गेली असून पाच पत्राशेड फुल्ल झाले आहेत. विठ्ठल मंदिर परिसरासह चंद्रभागा वाळवंट भाविकांच्या गर्दी फुलून गेले आहे. दरम्यान विठ्ठल मंदिर परिसरातील रस्त्यावर स्थानिक दुकानदार आणि फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर याचा मनस्ताप सहन करावा लागला.