Solapur News: साेलापूरात मध्यरात्री १२ वाजता अभूतपूर्व उत्साहात महामानवास अभिवादन; जनसागर अन् परिसर 'जय भीम'च्या घोषणांनी दणाणून गेला!

Emotional public gathering in Solapur latest news: डॉ. बाबासाहेबांच्या १३५व्या जयंतीनिमित्त मध्यरात्री पार्क चौक भीममय; निळ्या झेंड्यांच्या साक्षीने ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणला, हजारो नागरिकांनी कृतज्ञतेने अभिवादन
Massive midnight gathering in Solapur as people pay tribute with “Jai Bhim” chants.

Massive midnight gathering in Solapur as people pay tribute with “Jai Bhim” chants.

sakal

Updated on

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पार्क चौकात मध्यरात्री बारा वाजताच भीमसैनिकांचा उत्स्फूर्त जनसागर उसळला आणि परिसर “जय भीम”च्या घोषणांनी अक्षरशः दणाणून गेला. निळ्या झेंड्यांच्या साक्षीने संपूर्ण चौक भीममय झाला होता. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत हजारो नागरिकांनी कृतज्ञतेने अभिवादन केले; त्या क्षणी वातावरणात अभिमान, आदर आणि भावनांचा संगम अनुभवायला मिळत होता. चौकात उभारलेल्या पुस्तकांच्या स्टॉल्स, बाबासाहेबांच्या प्रतिमा, झेंडे आणि विविध साहित्यामुळे विचारांचा जणू जिवंत उत्सव रंगला. तरुणाईबरोबरच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा सहभाग दिसून आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com