चालू भावानुसार साडेतीन लाख रुपयांचे डाळिंब चोरीला गेल्याचे मुल्ला यांचे म्हणणे आहे. पण, पोलिस फिर्यादीत ६० हजार रुपयांचेच डाळिंब चोरीला गेल्याची नोंद आहे. त्यांच्या शेतात यायला मुख्य रस्त्यापासून कच्चा रस्ता आहे.
Pomegranate orchard in Sangola looted; 300 trees stripped of produce by unidentified thieves at dawn.Sakal
सोलापूर : हातीद (ता. सांगोला) येथील शेतकरी अल्ताफ पापसो मुल्ला यांच्या शेतातील तीन टन डाळिंब चोरट्याने गुरुवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास चोरून नेले. मुल्ला यांनी या प्रकरणी सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे.