

“Horror After Wedding: Vehicle Carrying Family Meets Fatal Accident; Newlyweds Escape”
Sakal
पांगरी : विवाहानंतर देवदर्शानास नवरा-नवरीसह नातेवाईक जात असलेल्या महिंद्रा कारला मालट्रकने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील सात पैकी पाच जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. ३०) सांयकाळी साडे सात वाजेच्या सुमारास बार्शी -लातूर रस्त्यावर घारीपासून (ता. बार्शी) एक कि.मी.अंतरावर जांभळबेटातील पुलावर घडली होती. या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.