esakal | राजकीय समीकरणे जुळवत राष्ट्रवादी नंबर वन होण्याच्या तयारीत!
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय समीकरणे जुळवत राष्ट्रवादी नंबर वन होण्याच्या तयारीत!

राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोलापूर महापालिकेत नंबर वन होण्याची रणनीती आखली आहे. त्यासाठी सोलापूरच्या राजकारणात महत्त्वाचे मोहरे सोबत घेतले जाणार आहेत.

राजकीय समीकरणे जुळवत राष्ट्रवादी नंबर वन होण्याच्या तयारीत!

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राष्ट्रवादीचे (NCP) पक्षाध्यक्ष तथा तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापूर महापालिकेच्या (Solapur Municipal Corporation) निवडणुकीत प्रचार सभा घेतली. सभा झाली, महापालिकेचा निकाल समोर आला तेव्हा फक्त 16 नगरसेवक विजयी झाले होते. आता राज्यात सत्ता आहे. याच सत्तेच्या जोरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोलापूर महापालिकेत नंबर वन होण्याची रणनीती आखली आहे. त्यासाठी सोलापूरच्या राजकारणात महत्त्वाचे मोहरे सोबत घेतले जाणार आहेत.

हेही वाचा: दादाचं पक्षांतर अन्‌ जमा-खर्चाचा हिशेब !

राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षाने आतापर्यंत सोलापूर महापालिकेच्या निवडणुका लढविल्या आहेत. 16 जागांच्या पुढे सोलापुरात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा कधीच सरकला नाही. 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सर्वात खराब कामगिरी झाली. अवघे चार नगरसेवक निवडून आले. सध्याच्या महापालिकेत भाजपला मिळालेल्या सर्वाधिक जागा, सर्वाधिक जागा मिळवूनही महापालिका चालविण्यात अपयशी ठरलेला भाजप यामुळे आगामी निवडणुकीतील मौका राष्ट्रवादीला दिसू लागला आहे. हा मौका साधण्यासाठी सोलापुरात त्या-त्या परिसरात असलेल्या सरदारांना राष्ट्रवादीने आपलेसे करण्याची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा: 'या' निवडणुकीतील विजयानंतर प्रणिती शिंदेंना मंत्रिपद?

माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक आनंद चंदनशिवे या दिग्गजांना राष्ट्रवादीने सोबत घेण्याची रणनीती आखली आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी गेल्या चार वर्षात केलेल्या पक्ष बांधणीमुळे राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीतील वातावरण पोषक मानले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत नंबर वनचा पक्ष होण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. सोलापूरच्या राजकारणात असलेले सामाजिक समीकरण जुळविण्यासाठी राष्ट्रवादीने योग्य पावले टाकण्यास सुरवात केल्याने आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.

दोन्ही मामांनी घातले लक्ष

आगामी निवडणुकीत सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडविण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी लक्ष घातले आहे. सोलापुरातील नेत्यांना बारामतीपर्यंत जाण्यासाठी या दोन्ही मामांचा मोठा आधार मिळत आहे. याशिवाय राज्यातील सत्तेच्या माध्यमातून महापालिकेत निवडणूकपूर्व तयारी करण्यासाठी पालकमंत्री भरणे यांच्या माध्यमातून मोलाची मदत होत आहे.

loading image
go to top