esakal | मंत्र्यांनी सामाजिक तेढ निर्माण करू नये : माऊली पवार; सकल मराठा समाजाकडून वडेट्टीवार यांचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

सकल मराठा समाजाकडून मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निषेध

घटनात्मक पदावरील जबाबदार मंत्र्यांनी सामजिक तेढ निर्माण करू नये, असे म्हणत वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत निषेध व्यक्त केला.

सकल मराठा समाजाकडून मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निषेध

sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : ओबीसी (OBC), व्हीजेएनटींच्या (VJNT) नुकत्याच झालेल्या निर्धार मेळाव्यात बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे दोन समाजात दुफळी निर्माण होत आहे. घटनात्मक पदावरील जबाबदार मंत्र्यांनी सामजिक तेढ निर्माण करू नये, असे म्हणत वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) वतीने माऊली पवार (Mauli Pawar) यांनी पत्रकार परिषदेत निषेध व्यक्त केला.

हेही वाचा: बुद्धिजीवी राहिले दूर ! राजकीय अस्तित्वासाठी ओबीसी मेळावा

भटक्‍या विमुक्तांच्या मुक्ती दिनाचे औचित्य साधून 31 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे ओबीसी, व्हीजेएनटी समन्वय समितीच्या वतीने बहुसंख्य ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा झाला. या मेळाव्यात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बहुजन समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वराज्याच्या सेवेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला आरक्षण दिले. मात्र, आताचे राजे (खासदार संभाजीराजे भोसले) आमच्याच आरक्षणात वाटा मागत आहेत, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सकल समाजाच्या वतीने गुरुवारी (ता. 2) सोलापूर श्रमिक पत्रकार संघात सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली. या वेळी राजन जाधव, भाऊ रोडगे, गणेश देशमुख, विजय पोखरकर, श्रीरंग नाळे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.

सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपद स्वीकारताना कोणत्याही समाजाबद्दल ममत्व अथवा आकस बाळगणार नाही, अशी शपथ घेतली आहे. तरीही ते वारंवार अशी वक्तव्ये करत आहेत. काही दिवसांपूर्वी जालना येथे राज्य मागास आयोगच बोगस असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. या वेळी सकल मराठा समाजाने कॉंग्रेस भवनसमोर आंदोलन केले होते.

हेही वाचा: राजकीय समीकरणे जुळवत राष्ट्रवादी नंबर वन होण्याच्या तयारीत!

कॉंग्रेसने भूमिका स्पष्ट करावी : गणेश देशमुख

मंत्री विजय वडेट्टीवार यांना अद्याप बहुजन विकास खात्याची वेबसाईट तयार करता आली नाही. बहुजन समाजाच्या सुधारणा बाजूला ठेवत ते वारंवार प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. कॉंग्रेसने याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी. पक्ष याबद्दल त्यांच्यावर काय कारवाई करणार, हे सांगावे, असे म्हणत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

कॉंग्रेसला परिणाम भोगावे लागतील : राजन जाधव

कॉंग्रेस आताच चौथ्या क्रमांकावर आहे. विजय वडेट्टीवार यांची भूमिका हीच कॉंग्रेसची भूमिका असेल तर त्याचे परिणाम कॉंग्रेसला भोगावे लागतील. मराठा समाज हा सर्वच राजकीय पक्षात आहे. मराठा समाजाला कॉंग्रेसवर बहिष्कार घालावा लागेल. पक्षाने या विचार करावा.

मंत्री वडेट्टीवार यांच्यावर पत्रकार परिषदेत केलेले आरोप

  • चौकशीच्या नावाखाली सारथी योजना बंद पाडली

  • बंद पाडलेल्या सारथी योजनेच्या गाड्यांचा स्वत:साठी वापर

  • यापूर्वीही तुळजापूर, जालना येथेही प्रक्षोभक वक्तव्य

  • बहुजन विकास खात्याची अद्याप वेबसाईटही नाही

loading image
go to top