May rainfall Maharashtra Update: सोलापुरातील कडक उन्हाळा दरवर्षी मे महिन्यात अनुभवायला मिळतो. यावर्षी मात्र मे महिन्यातच पावसाळा अनुभवायला मिळाला. मे महिन्यातील आतापर्यंतच्या २१ दिवसांमध्ये पावसाचे सरासरी ८ दिवस ठरले आहेत..मे महिन्यात जिल्ह्यात आतापर्यंत ८४.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सांगोला आणि मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यात मे महिन्यात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल, रविवारपर्यंत (ता. २५) पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाच्या चार महिन्यात सरासरी ४८१ मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात होतो. यावर्षी मे महिन्यातच पाऊस दमदार बरसला आहे. यावर्षीचा मॉन्सून २७ मेपर्यंत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने शेवटच्या टप्प्यातील उन्हाळा यावर्षी सुसह्य झाला. शेवटच्या टप्प्यात उन्हाचा चटका कमी झाला असला तरीही आर्द्रता ९० टक्क्यांच्या पुढे गेल्याने वातावरणात दमटपणा वाढला आहे..High Blood Pressure Symptoms: उच्च रक्तदाबाचे लक्षणांचे 'हे' 5 संकेत दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात आरोग्यावर गंभीर परिणाम.यावर्षी वेळेत आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस सांगितल्याने बळीराजा खरिपाच्या तयारीला लागला आहे. १४ मे ठरला सर्वाधिक पावसाचा दिवस जिल्ह्यात आतापर्यंतच्या २१ दिवसांमध्ये १४ मे हा सर्वाधिक पावसाचा दिवस ठरला आहे. या दिवशी जिल्ह्यात सरासरी ३५.७मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दिवशी मोहोळ महसूल मंडळात ९८.५ मि.मी, भोसे ८३.३, म्हैसगाव मंडळात ७२, कोर्टी ७०.८. शिवणे व महूद ६७, करमाळा, नाझरे, सावळेश्वर मंडळात ६६.३, जवळा, हातीद व सोनंद मंडळात ६२, केत्तूर ६०, अर्जुननगर ५८, सालमे ५७.३, रोपळे ५७, कोळा ५६.३, मरवडे ५१, कुर्डवाडी महसूल मंडळात ५० मिलिमीटर पाऊस झाला आहे..मे महिन्यातील तालुकानिहाय पाऊस तालुका उत्तर सोलापूर- पाऊस मिमी : ९९.३, पावसाचे सरासरी दिवस : ९ दक्षिण सोलापूर- पाऊस मिमीमध्ये : ८९.८, पावसाचे सरासरी दिवस : ७ बार्शी - पाऊस मिमीमध्ये : ५२.००, पावसाचे सरासरी दिवस : ५ अक्कलकोट- पाऊस मिमीमध्ये : ८३.९, पावसाचे सरासरी दिवस : ७ मोहोळ - पाऊस मिमीमध्ये : ७८.०, पावसाचे सरासरी दिवस : ३ माढा - पाऊस मिमीमध्ये : ८६.० , पावसाचे सरासरी दिवस : ४ करमाळा- पाऊस मिमीमध्ये : ८३.३, पावसाचे सरासरी दिवस : ५ पंढरपूर पाऊस मिमीमध्ये : ५६.५, पावसाचे सरासरी दिवस : ४ सांगोला पाऊस मिमीमध्ये :११६.७, पावसाचे सरासरी दिवस : ८ माळशिरस पाऊस मिमीमध्ये : ८६.५, पावसाचे सरासरी दिवस : ६ मंगळवेढा पाऊस, मिमीमध्ये : १११.४, पावसाचे सरासरी दिवस : ६ .Agriculture Courses After 10th: नोकरी की व्यवसाय? दहावीनंतर कृषी शिक्षण देईल दोन्ही पर्याय.अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील तापमान अजूनही टिकून आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे. हीच स्थिती कायम राहणे शक्य आहे. त्यामुळे नियमित पावसाळ्यातील जून ते जुलैपर्यंत पावसाची हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज आहे. आता होत असलेल्या अवकाळी पावसाचा काहीही परिणाम नियमित पावसाळ्यावर होणार नाही. - रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.