Ladki Bahin Yojana
esakal
माझी लाडकी बहीण योजनेत अविवाहित लाभार्थींना वडिलांची व विवाहितांना पतीची ई-केवायसी आवश्यक
वार्षिक उत्पन्न पडताळणीसाठी ई-केवायसी अनिवार्य
ई-केवायसी प्रक्रियेमुळे दिवाळीचा लाभ उशिरा मिळण्याची शक्यता
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) लाभार्थींची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार योजनेतील अविवाहित लाभार्थींना वडिलांची तर विवाहितांना त्यांच्या पतीची देखील ई- केवायसी (Solapur Ladki Bahin Yojana) करावी लागणार आहे. त्यातून लाभार्थी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीत मिळणारा लाभ लांबणीवर पडणार आहे.