

University Syllabus Includes Inspirational Novel on Savitribai Phule
sakal
सोलापूर: सावित्रीबाई फुले यांचे चरित्र उत्कृष्टरीत्या रेखाटणारी ‘ मी सावित्री जोतीराव’ ही कादंबरी सोलापूरच्या लेखिका डॉ. कविता मुरुमकर यांनी रेखाटली आहे. संशोधात्मक पद्धतीने सावित्रीबाईंचे चरित्र सांगणाऱ्या पहिल्या लेखिका होण्याचा मान सोलापूरच्या लेखिकाला मिळाला असून या कादंबरीचा समावेश द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बरोडा, वडोदरा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.