
Solapur teacher expresses concern as her fixed deposit remains inaccessible while arranging funds for husband’s cancer treatment.
Sakal
सोलापूर : शाळांना १७ ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी लागते. या सुट्ट्यांमध्ये पतीच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी बॅंकेतील चार लाखांची ठेव मोडायची होती. आता १६ किंवा १७ तारखेला एफडी मोडून दवाखान्यात पैसे भरायचे होते. पण, बॅंकेचे व्यवहार बंद झाल्याने पतीची शस्त्रक्रिया कशी करायची? या चिंतेने निवृत्तीच्या उंबरठ्यावरील एका शिक्षिकेची झोपच उडाली आहे.