
सांगोला तालुक्यातील कोळा, जुनोनी, य. मंगेवाडी, सावे, सांगोला शहरात ओबीसी समाजाच्या घोंगडी बैठका झाल्या.
सांगोला (सोलापूर) : सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (Political reservation of OBCs) स्थगिती मिळाली असून, अखंड ओबीसी समाजाचं वाटोळं करण्याचं पाप राज्य सरकारने केलं आहे. ओबीसी समाज संघटित करून त्याची वज्रमूठ करण्यासाठी घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मेंढराचं नेतृत्व लांडगा कसा काय करू शकतो, असा प्रश्न उपस्थित करत, आरक्षणाचा विषय आपल्याला समजला नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. बिरोबाची ताकद काय असते हे प्रस्थापितांना कळाले आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा ठाम विश्वास आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी व्यक्त केला. (Meeting of MLA Padalkar in Sangola taluka for reservation of OBC community-ssd73)
सांगोला तालुक्यातील कोळा, जुनोनी, य. मंगेवाडी, सावे, सांगोला शहरात ओबीसी समाजाच्या घोंगडी बैठका झाल्या. या वेळी आमदार पडळकर बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात एकीकडे डान्सबार सुरू आहेत तर दुसरीकडे पांडुरंगाची वारी बंद, असा विरोधाभास आहे. ओबीसी समाज संघटित करून त्यांची वज्रमूठ करण्यासाठी घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांवर दगड- गोटे पडले तरी घोंगडी बैठका राज्यभर सुरूच राहणार आहेत. घोंगडी बैठकांच्या माध्यमातून प्रस्थापितांचं राजकीय अस्तित्व संपवल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
या वेळी भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, ब्रह्मानंद पडळकर, माऊली हळणवर, बाबा चव्हाण, विष्णुपंत अर्जुन, आनंदा माने, दादासाहेब लवटे, संतोष देवकते, काशिलिंग गावडे, विष्णू देशमुख, दत्तात्रय जानकर, बाळासाहेब सरगर, तायाप्पा माने, संकेत काळे, कामाजी नायकुडे, राजेंद्र कोळेकर, बिरा शिंगाडे, आनंदराव मेटकरी, अप्पासाहेब कोकरे, बापू जावीर, अनिल पाटील यांच्यासह ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.