esakal | दरबार जनतेचा, अजितदादांपर्यंत पोहोचण्याचा !
sakal

बोलून बातमी शोधा

दरबार जनतेचा, अजितदादांपर्यंत पोहोचण्याचा !

दरबार जनतेचा, अजितदादांपर्यंत पोहोचण्याचा !

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद गटात व 11 नगरपालिका असलेल्या शहरांमध्ये "नागरिकांचा जनता दरबार' भरविला जाणार आहे.

सोलापूर : सत्ता असो वा नसो, राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या दिवसाची सुरवातच होते ती सकाळी सातपासून. खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी रात्रन्‌दिवस झटणारे नेतृत्व म्हणून अजित पवार यांची राज्यभर ओळख आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद गटात व 11 नगरपालिका असलेल्या शहरांमध्ये "नागरिकांचा जनता दरबार' (Janata Darbar) भरविला जाणार आहे. दरबार जनतेचा, मार्ग अजित पवारांपर्यंत समस्या पोचवण्याचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील (NCP District Executive President Umesh Patil) यांच्या संकल्पनेतून केल्या जाणाऱ्या या अभियानाची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी नुकतीच सोलापूरच्या दौऱ्यात केली आहे. (Organizing Janata Darbar program on the occasion of Deputy Chief Minister Ajit Pawar's birthday-ssd73)

हेही वाचा: माजी महापौर सपाटेंविरुद्ध 'या' कारणामुळे फसवणुकीचा गुन्हा!

तलाठी कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी झेडपीच्या 68 गटांमध्ये व 11 नगरपालिकांमध्ये थेट हा जनता दरबार भरविला जाणार आहे. अभियानाच्या निमित्ताने कार्यकारी जिल्हाध्यक्ष या नात्याने उमेश पाटील हे स्वत: सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद (Solapur Zilla Parishaad) गटनिहाय व नगरपालिकानिहाय दौरा करणार आहेत. एका दिवसामध्ये एका नगरपालिका शहराचा व तीन ते चार जिल्हा परिषद गटांचा दौरा होईल. एका गटासाठी अडीच तासांचा वेळ दिला जाईल.

हेही वाचा: सोलापूरच्या 'पद्म'कन्येला विदेशात एक कोटीच्या नोकरीची ऑफर !

त्या जिल्हा परिषद गटातील जे मध्यवर्ती व मोठे गाव असेल त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा स्थानिक कार्यकर्ते ठरवतील त्या ठिकाणी "नागरिकांचा जनता दरबार' आयोजित करण्यात येईल. त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषद गटातील विविध गावांतून आलेल्या नागरिकांची, आवश्‍यक कागदपत्रांसह निवेदने स्वीकारली जातील. ही निवेदने "प्रति, मा. ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-32' या नावाने असणे अपेक्षित आहे. स्थानिक प्रशासन स्तरावरील विषय स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी प्रयत्न करता येईल. तरीही ही निवेदने अजित पवारांपर्यंत पोच करून त्या कामाचा पाठपुरावा थेट उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून केला जाईल.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व स्थानिक प्रमुख नेत्यांना व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन करतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना (Covid-19) संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. कार्यक्रमा संदर्भातील माहिती तारीख, वार, ठिकाण व वेळ पॅम्लेट वाटून, माईक रिक्षा फिरवून व बॅनर लावून दिली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे जास्तीत जास्त प्रमाणात मार्गी लागावीत, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

- उमेश पाटील, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

loading image