
सोलापूर : हडपसर (पुणे) सॅटेलाईट टर्मिनल विकासकामासाठी मध्य रेल्वेने १७ तासांचा मेगा ब्लॉक घेतला आहे. रविवारी हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-हरंगुळ या गाड्या रद्द करण्यात आल्या. याबरोबरच अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे रेल्वेची गर्दी कव्हर करण्यासाठी पुणे-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या नियमित २१ बससोबतच ९ जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या ३० बसमुळे प्रवाशांची सोय झाली.