संचालकांचा एकमताने निर्णय : विभागीय आयुक्तांकडे करणार "आदिनाथ'ला भाडेतत्त्वावर देण्याची मागणी

Adinath Karkhana
Adinath Karkhana
Updated on

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करणे गरजेचे असून, बॅंकेचे कर्ज उपलब्ध न झाल्यास कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्याचा निर्णय बुधवारी (ता. 8) रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत सभासदांची सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली होती; मात्र कोरोनामुळे त्यांनी सर्वसाधारण सभेची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त यांच्याकडे यासंदर्भात मागणी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी दिली आहे. 

या बैठकीला बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल, "मकाई'चे अध्यक्ष दिग्विजय बागल, "आदिनाथ'चे माजी अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष रमेश कांबळे, संचालक नानासाहेब लोकरे, डॉ. हरिदास केवारे, चंद्रहास निमगिरे, नितीन जगदाळे, बापूराव देशमुख, प्रकाश झिंजाडे, रामभाऊ गायकवाड, अविनाश वळेकर, आशीष गायकवाड, कार्यकारी संचालक अरुण बागनवर उपस्थित होते. आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जून महिन्यात संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली होती. याही बैठकीत आदिनाथ कारखाना सुरू करण्याविषयी चर्चा करण्यात आली होती. सध्या कारखान्यावर कर्ज असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यातून कारखाना बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत आहे. 

सत्ताधारी व विरोधी संचालक यांच्यात एकमत 
कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्‍यक आहे; मात्र कोरोना विषाणूचा होणारा प्रसार लक्षात घेता संचालक मंडळाने जूनच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्वसाधारण सभा घेण्यासाठी परवानगी मागितली होती. ही परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे विभागीय आयुक्त यांच्याकडे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात परवानगी मागच्या विषयी संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. 

याबाबत अध्यक्ष धनंजय डोंगरे म्हणाले, आदिनाथ कारखाना सुरू झाला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. संचालक मंडळ स्वतः कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. वेळेत कर्ज उपलब्ध न झाल्यास कारखाना भाडेतत्त्वावर द्यावा लागणार आहे. कारखाना सुरू करण्यासाठी आमच्या नेत्या रश्‍मी बागल प्रयत्न करत आहेत. आमचे संचालक मंडळ सभासदांच्या हिताचा निर्णय घेईल. 

माजी अध्यक्ष संतोष पाटील म्हणाले, आज विरोधात असलो तरी कारखाना सुरू करण्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य आहे. कारखाना सुरू झाला पाहिजे, कामगारांच्या पगारी दिल्या पाहिजेत, कारखान्यावरील कर्ज कमी करून कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही विरोधी संचालक सत्ताधारी संचालक मंडळास सहकार्य करण्यास तयार आहोत . 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Political Strategy Meets Personal Bond: Deshmukh Joins Raut’s Campaign Drive
Behind-the-Scenes Power Play Returns as Council Election Equations Shift
solapur
Hydro-Crisis Resolved: Ujani Canal Water Finally Injected into Man River Bed
Marathi News Esakal
www.esakal.com