
टेंभुर्णी : चार ब्रास अवैध वाळू वाहतूक करणारा बिगर नंबरचा टिपर पकडून पुढील कारवाईसाठी टेंभुर्णी पोलिस ठाण्याकडे घेऊन जात असताना, माढा विभागाच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या शासकीय वाहनास वाळू माफियांनी फॉर्च्युनर गाडी आडवी लावून पुढे जाण्यास प्रतिबंध केला. नंतर वाळू माफियांनी प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर- ठोकळ यांना असभ्य भाषेत बोलून त्यांच्यावर धावून जाऊन त्यांना हाताने धक्काबुक्की केली. दरम्यान, पोलिस आल्याचे दिसताच वाळू माफिया तेथून पळून गेले.