

MLA Dr. Babasaheb Deshmukh Raises Irrigation Crisis in Assembly
Sakal
सांगोला : सांगोला तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शेवटच्या आठ गावांना पाणी कमी दाबाने मिळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हा गंभीर प्रश्न विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडत आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या गावांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची आग्रही मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी “योग्य ती कार्यवाही तातडीने करू,” असे आश्वासन सभागृहात दिले.