
-संदीप गायकवाड
उ.सोलापूर: ज्याप्रमाणे देशात शेअर बाजाराचे व्यवहार सुरू असतात त्याप्रमाणेच सोलापूरचा दूध बाजाराचा व्यवहार चालतो. दर दहा ते पंधरा मिनिटाला दुधाचे दर बदलतात. संपूर्ण दिवसात प्रतिलिटर दहा रुपयापर्यंत चढउतार होतो. येथे दुधाचा दर हा प्रतिफॅट प्रमाणे ठरवला जातो. विशेष म्हणजे दहा पैसे प्रमाणात बाजाराची स्थिती सतत बदलत असते.